Pune : भोई प्रतिष्ठानच्या वतीने गुरुवारी वंचित मुलांसाठी ‘रंग बरसे’

एमपीसी न्यूज- कै शंकरराव भोई प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे वंचित घटकातील मुलांसाठी ‘रंग बरसे’ या रंगोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या उपक्रमाचे 24 वे वर्ष आहे. हा कार्यक्रम रास्ता पेठेत क्वार्टरगेट जवळ हॉटेल शांताई समोरील मैदानामध्ये गुरुवारी (दि.22) सकाळी 9 ते 11 या वेळेत होणार आहे.

या रंगोत्सवामध्ये ऊसतोडणी कामगारांची मुले, देवदासींच्या मुले, अनाथ, अंध, मूकबधिर तसेच रस्त्यावर फुगे विकणारी, डोंबाऱ्याचा खेळ करणारी तसेच विविध सामाजिक संस्थांमधील 1200 मुले सहभागी होऊन होळीचा आनंद लुटणार आहेत. या कार्यक्रमाला महिला व बालकल्याण विभागाचे सहसचिव लालसिंग गुजर, सहाय्यक आयुक्त अनिल गुंजाळ, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव, अप्पर पोलीस आयुक्त अनिल फुलारी आदी उपस्थित राहणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.