BNR-HDR-TOP-Mobile

Nigdi : दारूच्या नशेत जाळली शेजाऱ्याची गाडी; आरोपी अटकेत

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – दारूच्या नशेत शेजा-याच्या मोटारसायकलला आग लावली. यामध्ये मोटारसायकल जळून खाक झाली. ही घटना लहुजी वस्ताद झोपडपट्टी, निगडी प्राधिकरण येथे सोमवारी (दि. 18) पहाटे घडली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

पिंट्या शितोळे (वय 38, रा. लहुजी वस्ताद झोपडपट्टी, निगडी प्राधिकरण) असे अटक केलेल्या दारुड्याचे नाव आहे. याप्रकरणी कौसर युनिस शेख (वय 32, रा. लहुजी वस्ताद झोपडपट्टी, निगडी प्राधिकरण) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कौसर यांनी त्यांच्या घरासमोर त्यांची टिव्हीएस स्टार सिटी मोटारसायकल (एम एच 14 / डी सी 4927) पार्क केली होती. आरोपी पिंट्या हा दारू पिऊन आला. त्याने कौसर यांच्या दुचाकीवर कापड झाकले आणि आग लावली. यामध्ये दुचाकी जळून खाक झाली. दुचाकी जाळण्याचा कौसर यांनी पिंट्याला जाब विचारला असता पिंट्याने कौसर यांना शिवीगाळ करत बघून घेण्याची धमकी दिली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

.

HB_POST_END_FTR-A1
.