Alandi : आळंदीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त ग्रंथदिंडी

एमपीसी न्यूज : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे (Alandi) यांच्या 103 व्या जयंती उत्सवानिमित्त आज आळंदीमध्ये सकाळी 11 वाजता ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी प्रतिमा पूजन संपन्न होऊन सायंकाळी 4 ते 6 वाजता मुख्यसभा संपन्न होणार आहे.

संध्याकाळी 7 ते 10 यावेळत महाराष्ट्राची महागायिका कोमलताई पाटोळे यांचा गायनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नियोजित स्मारकाची जागेत अश्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Chakan : सीआरपीएफ कॅम्पमध्ये अधिकारी असल्याचे सांगून दीड लाखांची फसवणूक

या कार्यक्रमाचे संयोजक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, झोपडपट्टी सुरक्षा दल आळंदी, सकल मातंग समाज आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.