Green belt : ग्रीन बेल्ट मधील बांधकाम FSI  संदर्भात अभिप्राय मागवला

एमपीसी न्यूज – ग्रीन बेल्ट मधील बांधकम  FSI  संदर्भात  ग्रीन बेल्ट कृति समितीने मुख्यमंत्री तसेच प्रधान सचिव यांना जागा मालकांच्या वतीने प्रस्ताव दिला होता, (Green belt) त्या संदर्भात राज्य शासनाने पुणे महानगरपालिकेचा अभिप्राय मागवला आहे. म्हात्रे पूल ते दुधाने लॉन्स डीपी रोड लगत ग्रीन झोन मधील  जमिनी बाबत मागील पाच सहा महिन्यापासून सुरु असणाऱ्या प्रयत्नांना यश येत आहे.

यासंदर्भात पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार  यांची  शिष्टमंडळाने भेट घेऊन  FSI  संदर्भात प्रस्ताव दिला आहे. आर्किटेक्ट. दिनेश चंद्रात्रे यांनी ग्रीन बेल्ट मुळे जागा मालकांवर कसा अन्याय झाला आहे हे माननीय आयुक्तांना विस्तृत स्वरूपात समजावून सांगितले.(Green belt) पुणे महानगरपालिकेकडून राज्य शासनाला अहवाल यासंदर्भात पाठवला जाणार आहे. भविष्यात या विषयासंदर्भात – 20  FSI व कृषी वापर याबाबत राज्य शासन सरकारकडे आपणा सर्वांना पाठपुरावा करावा लागणार आहे.

Chikhli news: चिखली व मोशी मधील हाउसिंग सोसायटीमधील नागरिकांना वीजेच्या लपंडावांमुळे त्रास

आजच्या भेटीप्रसंगी आर्किटेक्ट दिनेश चंद्रात्रे माणिक शेठ दुधाने, बिपिन शेठ थोरात, बाळासाहेब बराटे, कुमार  बराटे, दिनेश बराटे, संदीप रानडे उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.