Ravet news: पान टपरीतील सामानाची तोडफोड करून शिवीगाळ करून गल्ल्यातील रुपयांची चोरी

एम पी सी न्यूज : पान टपरीतील सामानाची तोडफोड करून शिवीगाळ करून गल्ल्यातील रुपयांची चोरी पुनावळे येथे काल 19 ऑक्टोबरला घडली आहे.
याबाबत सुनिल सिंग राजपूत, वय 38 वर्षे, रा. पुनावळे माळवाडी यांनी रावेत पोलीस चौकीत फिर्याद दिली आहे. चार अनोळखी इसमांच्या विरोधात भा.द.वि कलम 392, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांच्या शिवराज पान शॉप नावाच्या पान टपरीवर एका कारमधून चार अनोळखी इसम काल 19 ऑक्टोबरला सायंकाळी 4.30 वा च्या सुमारास आले. पाण्याची बॉटल ची मागणी केली.

फिर्यादी यांनी त्यांना यापूर्वी तुमच्याकडे राहिलेले पैसे मला द्या असे म्हणले असता त्यांनी फिर्यादीच्या पान टपरीतील  समोर ठेवलेली चॉकलेट गोळ्या वगैरेचे भरण्यात तोडून फोडून शिवीगाळ व दमदाटी केली. त्यावेळी त्यातील एकाने जबरदस्तीने फिर्यादीच्या गल्ल्यात हात घालून गल्ल्यामधील 2,400 रुपये काढून घेऊन निघून गेले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.