Chikhli news: चिखली व मोशी मधील हाउसिंग सोसायटीमधील नागरिकांना वीजेच्या लपंडावांमुळे त्रास

एमपीसी न्यूज : चिखली व मोशी मधील 100 हाउसिंग सोसायटीमधील 25000 नागरिकांना काल रात्रीपासून चालू असलेल्या वीजेच्या लपंडावांमुळे त्रास सहन करावा लागत आहे. अशी माहिती संजीवन सांगळे,  अध्यक्ष, चिखली मोशी हाऊसिंग सोसायटीज फेडरेशन यांनी दिली आहे.
सांगळे म्हणाले की शिव रस्ता बोऱ्हाडेवाडी- जाधववाडी, देहू रस्ता बारणेवस्ती, सिटी प्राइड शाळा, ऐश्वर्यम हमारा, ई. परिसरात काल रात्री 9.30 वा. पासून वारंवार वीजेचे  ये -जा चालू आहे. तसेच पॉवर फ्लकचुएशन खूप होत  असल्यामुळे त्यामुळे 100 हाऊसिंग सोसायटीमध्ये राहत असणाऱ्या 25000 नागरिकांना त्रास होत आहे.

मल्हारी मदने, उप अध्यक्ष, चिखली मोशी हाऊसिंग सोसायटीज फेडरेशन म्हणाले की चिखली व मोशी परिसरात आय टी कर्मचारी राहतात ज्यांचे वर्क फ्रॉम होम चालू आहे. त्यांना वीज नसल्यामुळे खूप त्रास होतो. तसेच पॉवर फ्लकचुएशन खूप होत असल्यामुळे  घरातील इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब होत आहेत. मुलांची परीक्षा चालू आहेत व वीज नसल्यामुळे मुलांना अभ्यास करताना त्रास झाला.
संदीप तांदळे, सचिव, साहिल फोर्चून पार्क हौसिंग सोसायटी म्हणाले की त्यांच्या परिसरातील 40 ते 50 हौसिंग सोसायटी मधील वीज पुरवठा काल रात्री 9.30 वा पासून 5 मिनिट असतो व परत खंडीत होतो.  तसेच पॉवर फ्लकचुएशन खूप होत असल्यामुळे  घरातील इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब होत आहेत. महावितरण कार्यालयात फोन केल्यास ते उचलत नाहीत आणि उचलला तर ठोस उत्तर देत नाहीत. वीज पुरवठा बाबत विचारण्यासाठी महावित्रण च्या अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.