GST News : देशातील जीएसटी संकलन वाढले 22 टक्क्यांनी; महाराष्ट्रातून सर्वात जास्त जीएसटी

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या संकटातून देशाची आर्थिक परिस्थिती सुधारत असल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जुलैत झालेल्या एकूण जीएसटी संकलनात देशात 22 टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे.विशेष म्हणजे या महिन्यात महाराष्ट्रातून सर्वाधिक म्हणजेच 22 हजार 129 कोटी रुपयांचे जीएसटी (GST News) संकलन करण्यात आल्याची माहिती जाहीर करण्यात आली आहे.गेल्या जुलैमध्ये राज्यातून 18 हजार 999 कोटी रुपये जीएसटी संकलित करण्यात आला होता. जीएसटी लागू झाल्यापासूनचा हा दुसरा सर्वाधिक महसूल आहे.

 

केंद्राने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जुलै 2022 मध्ये देशातून 1 लाख 48 हजार 995 कोटी रुपयांचा जीएसटी संकलित झाला आहे. त्यात केंद्राचा म्हणजे सीजीएसटीचा हिस्सा 25 हजार 751 कोटी असून राज्यांमधील हिस्सा राज्यांमधील हिस्सा 32 हजार 807 कोटी रुपये आहे.तर आयजीएसटी (GST News) म्हणजे एकात्मिक वस्तू व सेवा कराचा हिस्सा 79, हजार 518 कोटी रुपये आहे आणि उपकराच्या माध्यमातून 10 हजार 920 कोटी रुपये महसूल प्राप्त झाला आहे. जुलैमध्ये वस्तूंच्या आयातीतून मिळणारा महसूल 48 टक्के अधिक होता आणि देशांतर्गत व्यवहारातून प्राप्त महसूल मागील वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत या स्त्रोतांमधून मिळालेल्या महसुलापेक्षा 22 टक्के अधिक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.