Crime News : काळेवाडी भागात पहाटे गाडयांना लागली आग

एमपीसी न्यूज – राहटणीमधील काळेवाडी भागात आज पहाटे गाडयांना आग लागली होती.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे लीडींग फायरमन (तांडेल) गौतम इंगवले म्हणाले की, “नढेनगरमधील माने चौकाजवळील वैभव पॅराडाईस समोर रस्त्यावर पार्क केलेल्या गाड्यांना आग लागली होती. पिंपरी केंद्रावरून अग्निशमन बंब घटनास्थळी पाठवण्यात आले होते. आगीमध्ये 3 दु चाकी पूर्णपणे जळल्या तर 1 कार अर्धवट जळाली आहे. आगीचे कारण अजून कळाले नाही.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.