GST on Sugarcane Juice : म्हणून उसाच्या रसासाठी द्यावा लागणार 12 टक्के जीएसटी

एमपीसी न्यूज – उसाच्या रसावर 12 टक्के जीएसटी द्यावा लागणार आहे. (GST on Sugarcane Juice) अशा प्रकारचा निर्णय उत्तर प्रदेश मधील जीएसटी ऍडव्हान्स रुलिंग ऍथॉरिटीने (UP Authority for Advance Ruling) दिला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात थंडगार उसाचा रस प्यायचा असेल तर जीएसटीपोटी 12 टक्के देण्याची तयारी ठेवावी लागणार आहे.

MI vs RCB : यावर्षीही मुंबई इंडियन्सचा पहिला सामना देवालाच का?

महाराष्ट्रात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. मुबलक मिळणाऱ्या उसामुळे ठिकठिकाणी उसाच्या रसाचे गाडे आणि रसवंती आहेत. तिथे उसाचा रस दहा रुपयांपासून 20 रुपयांपर्यंत प्रती ग्लास प्रमाणे विकला जातो. उन्हाळ्याच्या दिवसात अनेकजण उसाच्या थंडगार रसाला पसंती देतात. विथ आईस, विदाऊट आईस, लिंबू पिळलेल्या रसाला मोठी मागणी असते.

म्हणून द्यावा लागणार जीएसटी
उसाचा रस हा कृषी उत्पादनात (Agricultural production) मोडत नाही. तसेच तो फळ नाही आणि भाजी देखील नाही. उसाच्या रसाच्या बाबतीत कृषी उत्पादनासाठी लागणाऱ्या अटींची पूर्तता होत नाही. त्यामुळे त्यावर जीएसटी लागणार आहे. व्यापारी तत्वावर उसाचा रस विकला जाणार असेल तर त्यावर जीएसटी लागेल.

कुठे द्यावा लागेल जीएसटी
रस्त्याच्या बाजूला ठिकठिकाणी रसवंती असतात. काही ठिकाणी लाकडी घाण्याद्वारे उसाचा रस काढला जातो. अशा ठिकाणी जीएसटी देण्याची आवश्यकता नाही. (GST on Sugarcane Juice) मात्र जीएसटी क्रमांक धारण करणाऱ्या दुकानातून उसाचा रस घेतला तर मात्र बिलात उसाच्या रसावर 12 टक्के जीएसटी द्यावाच लागणार आहे.

असे आले प्रकरण समोर
उत्तर प्रदेश मधील गोविंद सागर मिल्स  या कारखान्याने उसाचा रस व्यापारी तत्वावर विकण्याचे नियोजन केले. (GST on Sugarcane Juice) व्यापारी तत्वावर रस विकला जाणार असल्याने त्यावर जीएसटी लागेल का, याबाबत कारखान्याने जीएसटी ऍडव्हान्स रुलिंग ऍथॉरिटीकडे संपर्क केला. त्यावेळी उसाच्या रसावर देखील जीएसटी लागतो, ही बाब समोर आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.