Pimpri : आला उन्हाळा….आरोग्य सांभाळा 

एमपीसी न्यूज- सध्या उन्हाच्या झळा वाढत आहेत. (Pimpri )त्यामुळे घराबाहेर निघताना चटके लागत आहे. त्यामुळे नागरिकांना डीहायड्रेशन, ताप, चक्कर येणे, मळमळ होणे असे विविध त्रास जाणवत आहेत.

पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरी म्हणून ओळखली जाते. शहरात विविध भागातून राज्यभरातून सामान्य नागरिक रोजगारासाठी व कामासाठी येतात. मात्र कामापासून वेळ मिळत नसल्याने अनेकवेळा भुकेच्या तडाख्यात स्वस्त दरात मिळेल ते अन्न खातात. त्यामध्ये रस्त्यावरील वडापाव ,भजी, समोसे खाणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. हे तेलकट पदार्थ खाल्ल्याने अनेकांना मळमळ उलट्या असे त्रास होतात. अशावेळी डॉक्टरांचा अनेक वेळा नागरिकांना सल्ला देण्यात येतो की उन्हाळ्याच्या दिवसात शक्यता तेलकट पदार्थ टाळावेत. त्यामुळे चेहऱ्यावर मुरूम आणि पुरळ दिसू लागतात. उन्हाळ्यात तेलकट पदार्थ खाणे टाळावे.

GST on Sugarcane Juice : म्हणून उसाच्या रसासाठी द्यावा लागणार 12 टक्के जीएसटी

वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राजेंद्र वाबळे म्हणाले वातावरणात बदल झाल्यास आजारी पडण्याचे प्रमाण वाढते. त्याचे मूळ कारण शरीरातील पाण्याची कमतरता असते .(Pimpri) त्यामध्ये अनेक नागरिकांना पूर्वीच्या ऋतूची सवय झालेली असते. थंडीमध्ये कमी पाणी पिण्याची सवय मेंदूला ही होते. उन्हाळ्यात तापमानात वाढ झालेली असते. रक्तामध्ये पाण्याचे प्रमाण कमी,‌ प्रतिकार शक्ती कमी झाल्यास सर्दी ,खोकला, ताप हे आजार जडतात. त्यामुळे उन्हाळ्यात जास्त पाणी पिणे गरजेचे आहे.

 

 

हे पदार्थ खावे-

* उन्हाळ्याच्या दिवसात ताजे पचायला हलके असणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करा.

* लिंबू पाणी, ताक, शहाळे,नाचणीचे आंबिल याचेही सेवन करावे.

* या दिवसात आहारात ज्वारी,बाजरी वरण-भात, हिरव्या भाज्या, हलक्या पदार्थांचा समावेश करावा.

 

 

हे पदार्थ टाळावेत 

* अति तेलकट, तिखट,फास्ट फूड पदार्थ टाळावेत. कारण यामुळे पित्त, अपचन,गॅसचा त्रास होतो

* मासे,अंडी मांसाहाराचे प्रमाण कमी असावे.

* आहारात तळलेले पदार्थ, लोणचे चटण्या खाणे टाळा.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.