State Excise Department : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसुलात 25 टक्क्यांनी वाढ

एमपीसी न्यूज –  राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ( State Excise Department) महसुलात मागील वर्षीच्या तुलनेत 25 टक्क्यांनी वाढ झाली. राज्य उत्पादन शुल्क विभाग हा राज्य शासनाला महसूल मिळवून देणारा तिसरा सर्वात मोठा विभाग आहे. या विभागाच्या महसुलात सरत्या आर्थिक वर्षात 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सन 2021-22 या आर्थिक वर्षात 17 हजार 500 कोटी रुपये इतका महसूल उत्पादन शुल्क (State Excise Duty) विभागाने मिळवला होता. सन 2022-23 या सरत्या आर्थिक वर्षात विभागाने 21 हजार 500 कोटी रुपये इतका विक्रमी महसूल राज्याच्या तिजोरीत जमा करण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने यश मिळवले आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या इतिहासात पहिल्यांदाच इतका महसूल राज्याच्या तिजोरीत जमा झाला आहे.

Pimpri : आला उन्हाळा….आरोग्य सांभाळा 

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मद्यार्कयुक्त आणि अंमली पदार्थांवर उत्पादन शुल्क आकारले जाते. तसेच मद्यार्कयुक्त पदार्थांवर नियंत्रण ठेवणे आणि त्यासंदर्भातल्या गुन्ह्यांचे अन्वेषण करण्याचीही जबाबदारी उत्पादन शुल्क विभागाकडे असते. अवैध मद्य निर्मिती, बेकायदेशीर मद्य वाहतूक आणि त्या संदर्भातील विविध प्रकरणांमध्ये उत्पादन शुल्क विभागाकडून मोठ्या कारवाया देखील केल्या जातात.

मंत्री शंभूराज देसाई  यांनी बनावट मद्यनिर्मिती आणि बेकायदेशीर मद्य वाहतूक व विक्री रोखण्यासाठी विशेष उपाययोजना राबविण्याकडे लक्ष दिले आहे. (State Excise Department) राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसुलात 25 टक्क्यांनी वाढ तसेच भरारी पथकांना (flying squad) तपासणी नाक्यांवर प्रभावीपणे सक्रिय केले. यामुळे उत्पादन शुल्क विभागात निर्माण झालेले चैतन्य सरत्या आर्थिक वर्षातील 25 टक्के महसूल वाढीच्या रूपाने प्रतिबिंबित झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.