MI vs RCB : यावर्षीही मुंबई इंडियन्सचा पहिला सामना देवालाच का?

एमपीसी न्यूज – मुंबई इंडियन्स हे आज संध्याकाळच्या दुसऱ्या सामन्यांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्याशी खेळणार आहेत. हा सामना बेंगलोरच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर होणार आहे. (MI vs RCB) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर चा कर्णधार हा फाफ डुप्लेसेस असला तरी समर्थकांसाठी हा सामना भारताचे प्रमुख फलंदाज रोहित शर्मा विरुद्ध विराट कोहलीचाच असणार आहे. रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे तर विराट कोहलीने 2021 च्या आयपीएलच्या मध्यातच कर्णधार पदाचा राजीनामा दिला होता.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर च्या घरात होणाऱ्या सामन्यांमध्ये बेंगलोर नक्कीच चांगली सुरुवात करायचा प्रयत्न करेल आणि स्वतःच्या पोम पीचवर समर्थकांना खुश करण्याचाही प्रयत्न करेन. त्यांचा संघात  फाफ डुप्लेसेस (C), विराट कोहली, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल , मायकल ब्रेसवेल , दिनेश कार्तिक, शहबाज अहमद, सुयश प्रभुदेसाई, हर्षल पटेल, आकाश दीप, रेस टॉपली  इम्पॅक्ट प्लेयर यांचा समावेश आहे. (MI vs RCB) म्हणून जर आरसीबीने पहिली फलंदाजी केली तर दुसऱ्या इनिंग्स ला मोहम्मद सिराज, करण शर्मा येऊ शकतात. हेच जर आरसीबीने पहिली गोलंदाजी केली तर करण शर्मा किंवा मोहम्मद सिराज पैकी कुणाला तर पहिल्या 11 मध्ये ठेवून दुसऱ्या इनिंग मध्ये सुयश सरदेसाई किंवा महिपाल लोमरोरला आणू शकतात.

Shirgaon : सरपंच गोपाळे यांच्या खून प्रकरणी गुन्हा दाखल

 

मुंबई इंडियन्स बाकीच्या संघांसारखे चांगले सुरुवात करायच्या ध्येयाने मैदानावर उतरतील. त्यांचा संघात रोहित शर्मा (C), ईशन किशन, सूर्यकुमार यादव, टीम डेविड , कॅमेरॉन ग्रीन , रमणदीप सिंग, जोफ्रा आर्चर , रितिक शोकिन, संदीप वॉरियर, जेसन बेहेरेंडोर्फ , कुमार कार्तिकेया या खेळाडूंचा समावेश आहे. तर इम्पॅक्ट प्लेयर्स म्हणून जर मुंबईने पहिली फलंदाजी केली तर दुसऱ्या इनिंग्स ला पियुष चावला, डेव्हाल्ड ब्रेविस येऊ शकतात. तेच पहिली गोलंदाजी करताना पियुष चावला किंवा डेव्हाल्ड ब्रेविस ला संघात घेऊन दुसऱ्या इनिंग्स मध्ये सूर्यकुमार यादव किंवा रमणदीप सिंगला आणू शकतात.

 

गेल्या वर्षात बरेचदा मुंबई इंडियन्स ही स्वतःचा पहिला सामना हरत आलेली आहे. बरेच समर्थक मुंबई इंडियन्सचा पहिला सामना देवाला असतो असे चेष्टेज म्हणतात. समर्थक जरी असे बोलत असले तरी मुंबई इंडियन्स चा गेल्या काही वर्षातील पहिल्या सामन्यातील पराक्रम हेच दाखवून देतो. (MI vs RCB) पण आरसीबीची कामगिरीही मुंबई इंडियन्स समोर एवढी काही चांगली नाही.  पण आरसीबी स्वतःच्या घरात चिन्नास्वामी स्टेडियमवर नक्कीच तयार असेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.