Shirgaon : सरपंच गोपाळे यांच्या खून प्रकरणी गुन्हा दाखल

चार संशयित पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील शिरगाव येथील सरपंचावर कोयत्याने वार करत त्यांचा निर्घृणपणे खून करण्यात आला. ही घटना शनिवारी (दि. 1) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास शिरगाव येथील साई मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर घडली. (Shirgaon) याप्रकरणी शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

प्रवीण साहेबराव गोपाळे (वय 47) असे खून झालेल्या सरपंचाचे नाव आहे. याप्रकरणी प्रवीण यांचे भाऊ रवींद्र साहेबराव गोपाळे (वय 47, रा. शिरगाव, ता. मावळ) यांनी फिर्याद दिली आहे.

Chinchwad : डॉ. सुदर्शन बोबडे ठरले ‘आऊटरीच नेटवर्क कोऑर्डिनेटर’ चे मानकरी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास प्रवीण हे त्यांच्या दुचाकीवर (एमएच 14/ एफझेड 7080) प्रति शिर्डी साई मंदिराच्या समोर रस्त्याच्या बाजूला बसले होते. त्यावेळी तिघांनी स्थानिक वादातून कट रचून त्यांच्यावर कोयत्याने वार करत त्यांचा निर्घृणपणे खून केला.(Shirgaon) याबाबत फिर्यादी रवींद्र यांनी काही स्थानिक व्यक्तींवर संशय व्यक्त केला आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयावरून चौघांना ताब्यात घेतले आहेत.

काही महिन्यांपूर्वीच झाले होते सरपंच

शिरगाव ग्रामपंचायतीची निवडणूक काही महिन्यांपूर्वीच झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रवीण गोपाळे सरपंचपदी विजयी झाले होते. त्यांचा प्लाॅटिंगचा व्यवसाय होता. त्यातूनच त्यांचा काही जणांशी वाद असल्याचे म्हटले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.