Haveli : हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी बंडखोर आणि भाजपच्या पॅनलचा दणदणीत विजय

एमपीसी न्यूज : हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत (Haveli ) राष्ट्रवादी बंडखोर आणि भाजपच्या पॅनलच्या अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीला 18 पैकी 13 जागावर दणदणीत विजय मिळविण्यात यश आले आहे. तर, राष्ट्रवादी पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनलचे 2 उमेदवार विजयी तर 3 जागांवर स्वतंत्र पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बालेकिल्ल्यात भाजपने धूर चारली आहे.

हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक जाहीर झाल्यापासून विशेष चर्चेत राहिली.हवेली तालुक्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व पाहण्यास मिळाले आहे.त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी अनेक वेळा मेळावे आणि बैठका देखील घेतल्या आहेत.

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पॅनल अगदी सहज निवडून येईल वाटत होते.त्याच दरम्यान पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर संचालक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक विकास दांगट यांनी स्वतंत्र पॅनल तयार केला.विकास दांगट यांच्या पॅनलमध्ये सर्व पक्षीय उमेदवार होते.

त्यामुळे ही निवडणुक विशेष अर्थाने चर्चेत राहिली आहे. त्याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी विकास दांगट यांची हकालपट्टी करीत असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्या निर्णयानंतर गारटकर आणि दांगट या दोघांमध्ये आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळाले.

या सर्व घडामोडी दरम्यान हवेली कृषि उत्पन्न बाजर समितीची निवडणूक पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अण्णासाहेब मगर शेतकरी विकास पॅनल आणि अण्णासाहेब मगर शेतकरी सहकार पॅनलमध्ये 18 जागांसाठी 57 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.

सेवा सहकारी संस्था गटातील 11 जागा, ग्रामपंचायात (Haveli) गटात 4, व्यापारी व आडते गटात 2 आणि हमाल, मापाडी गटातील 1 जागेसाठी मतदान पार पडले. व्यापारी गटात 13 हजार 174 मतदार,हमाल, तोलणार गटात 2 हजार 7 मतदार, सहकारी सेवा संस्था गटात 1918 मतदार आणि ग्रामपंचायत गटात 713 मतदार असे एकूण 17 हजार 812 मतदारांची संख्या आहे.तर त्यापैकी 12 हजार 877 जणांची मतदान केले आहे. त्यामुळे एकूण 72.29 टक्के इतके मतदान झाले आहे.

Nigdi : स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमालेचे आयोजन

त्यानंतर आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास स्वारगेट येथील शिवशंकर सभागृह येथे मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या मतमोजणी दरम्यान सुरवातीपासून राष्ट्रवादी बंडखोर आणि भाजपच्या पॅनलच्या अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार आघाडीवरच होते.

त्यामुळे 18 पैकी13 जागावर त्यांचे उमेदवार विजयी झाले.तर राष्ट्रवादी पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनलचे 2 उमेदवार विजयी झाले.तसेच 3 जागांवर स्वतंत्र पॅनलचे उमेदवार विजयी झाले.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बालेकिल्ल्यात भाजपने धूर चारली आहे.आता या निवडणुकीच्या निकालावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार नेमकी काय भूमिका मांडतात.हे पाहणे जरुरीचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.