Hinjawadi : तब्बल 87 सीसीटीव्ही तपासत महिलेची छेड काढणाऱ्यास अटक

एमपीसी न्यूज – अज्ञात दुचाकीस्वाराने महिलेची छेड काढत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर हिंजवडी पोलिसांनी तब्बल 87 सीसीटीव्ही फुटेज तपासत आरोपीच्या मुसक्‍या आवळल्या.

विलास राम गवळी (वय 28, रा. बावधन, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास आरोपीने बावधन येथे एका महिलेचा पाठलाग करून तिच्याशी गैरवर्तन करत विनयभंग केला. याबाबत गुन्हा दाखल झाला. मात्र आरोपीबाबत काहीच माहिती नसल्याने पोलिसांनी परिसरातील 87 सीसीटीव्ही फुटेज तपासत कोणत्या कंपनीची दुचाकी आहे ते निष्पन्न केले. मात्र आरोपीबाबत माहिती नव्हती. त्यानंतर पोलिसांनी अशा प्रकारच्या दुचाकी चालकांवर जवळपास महिनाभर नजर ठेवत संशयावरून आरोपी गवळी याला ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने रविवारी (दि. 16) त्यास अटक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.