Pimpri : औद्योगिक सांडपाण्याबाबतची माहिती द्या, अन्यथा कायदेशीर कारवाई

एमपीसी न्यूज – औद्योगिक कारखान्यांमधून निर्माण होणाऱ्या औद्योगिक ( Pimpri ) सांडपाण्याबाबतची माहिती सर्व उद्योजकांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर सर्वेक्षणावेळी उपलब्ध करुन द्यावी असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे. तसेच यासाठी मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर यांचे कार्यालयात स्वतंत्र कक्ष तयार करण्यात येणार असून ज्या उद्योगांची माहिती प्राप्त होणार नाही किंवा माहिती उपलब्ध करुन देण्यास जे उद्योजक सहकार्य करणार नाहीत त्यांच्यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच पर्यावरण (संवर्धन) अधिनियम 1986 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आयुक्त सिंह यांनी सूचित केले.

सप्टेंबर 2023 अखेर पर्यंत मुदत देऊनही औद्योगिक परिसरात तयार होणाऱ्या सांडपाण्याबाबतची माहिती पिंपरी चिंचवड शहरातील उद्योजकांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कार्यालय, चिंचवड तसेच मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर कार्यालयाकडे जमा केलेली नाही.

त्यामुळे औद्योगिक परिसरात तयार होणाऱ्या सांडपाण्याची गुणवत्ता व क्षमता निश्चित होत नसल्याने नियोजित प्रकल्पासाठी आवश्यक लेआऊट तयार करण्यास अडचण निर्माण होत आहे. याकरिता आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.

Hinjawadi : तब्बल 87 सीसीटीव्ही तपासत महिलेची छेड काढणाऱ्यास अटक

पिंपरी चिंचवड परिसरातील नद्यांचे उगमापासून औद्योगिक होणारे प्रदूषण रोखण्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्थापन केलेल्या समितीची बैठक आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार, दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी आयुक्त कक्षात पार पडली होती.

सदर बैठकीसाठी मुख्य अभियंता महाराष्ट्र विकास औद्योगिक प्राधिकरण, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळ, मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे प्रतिनिधी, लघू उद्योजकांचे प्रतिनिधी तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीस उद्योग मंत्री उदय सामंत यांनी यापूर्वी निर्देशित केल्याप्रमाणे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळने या कामासाठी नियुक्त केलेल्या प्रकल्प सल्लागाराचे विस्तृत सादरीकरण झाले होते.

त्यानुसार सदरचा प्रकल्प तातडीने कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने सर्व औद्योगिक कारखान्यामधून निर्माण होणाऱ्या औद्योगिक सांडपाण्याबाबतची माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळने निर्धारित केलेल्या नमुन्यात कार्यकारी अभियंता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कार्यालय, चिंचवड कार्यालयात 30 ऑगस्ट 2023 पर्यंत जमा करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

पण तरीही आतापर्यंत काही उद्योजकांनी कारखान्यांमधून निर्माण होणाऱ्या औद्योगिक सांडपाण्याबाबतची माहिती जमा केलेली नाही त्यामुळे प्रकल्पाच्या कामास विलंब होत असल्याने संबंधितांनी ही माहिती त्वरित पाठवावी असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले ( Pimpri )  आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.