Hinjawadi : तक्रार करूनही सदोष लिफ्ट वापरण्यास दिल्याप्रकरणी बिल्डरवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – वारंवार तक्रार देऊनही लिफ्टची कोणतीही दुरुस्ती न करता सदोष लिफ्ट ( Hinjawadi ) सोसायटीला तशीच वापरायला दिल्या प्रकरणी सोसायटीमधील फ्लॅट धारकांनी बिल्डरविरोधात थेट पोलिसांकडेच तक्रार केली आहे. त्याचे झाले असे की बाणेर येथील एका सोसायटीमध्ये गुरुवारी (दि.27) लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाडामुळे एक दुर्घटना घडली ज्यामध्ये सुदैवाने कोणही जखमी झाले नाही. यावरूनही तक्रार करण्यात आली आहे.

याप्रकरणी भरत तात्याबा चौधरी (वय 42 रा. बावधन) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून प्रकाश पांडुरंग चव्हाण (रा. कोथरूड), अनिल रामचंद्र जाधव व लिफ्ट फिटींग व मेंटेनन्स पाहणारी रिटेक कंपनी यांच्यावर हा गुन्हा दाखल केला आहे.

Kondhwa : कौसर बाग येथे भंगार मालाच्या गोडाऊनला व गॅरेजला आग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पत्नी व सोसायटीमधील आणखी एक रहिवासी हे लिफ्टने जात होते. यावेळी ते सातव्या मजल्यावर असताना लिफ्ट अचानक दहाव्या मजल्यावर गेली. तिथे लिफ्टचे दार उघडले. यावेळी फिर्यादी यांच्या पत्नी व सोबतचे गुरु फिरके बाहेर आले.ते बाहेर येताच लिफ्टचा दरवाजा बंद न होताच ती वेगाने तळमजल्यावर जाऊन आदळली.

सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र अशी धोकादायक लिफ्ट वापरास दिल्याने  त्याबाबत तक्रार करुनही लिफ्ट मेन्टेन्स कंपनी व बिल्डरने कोणतेही पावले उचलली नाहीत. यावरून सोसायटी धारकांनी थेट पोलिसांकडे तक्रार केली आहे. हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत  ( Hinjawadi ) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.