Hinjawadi : पुर्ववैमनस्यातून अल्पवयीन मुलासह एकाला कोयता व दगडाने मारहाण

एमपीसी न्यूज –  जुन्या भांडणाचा राग मनात धरून दोन ( Hinjawadi) अल्पवयीन मुलगा व त्याचा मित्र यांना सहा ते सात जणांच्या टोळक्याने कोयता, दगड व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. ही घटना गुरुवारी (दि.1) सुसगाव येथील पारखेवस्ती येथे रात्री घडला आहे.

Chikhali : पार्किंगमधून रिक्षा चोरणाऱ्या चोराला अटक

याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलाने फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी अविनाश चौगुले, रोहन पवार, ओमकार पाटील, संतोष धनावत व इतर 3 ते 4 जण यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्याचा मित्र पृथ्वीराज मुरकुटे हे पायी जात असताना आरोपी तेथे आले. यातील अविनाश याचे पृथ्वीराज याच्या आत्याच्या मुलाशी भांडण झाले होते.

याचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादी व त्याच्या मित्राला कोयता, दगड व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जखमी केले. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात ( Hinjawadi) मारहाण व बेकायदा शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल कऱण्यात आला  आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.