Chikhali : पार्किंगमधून रिक्षा चोरणाऱ्या चोराला अटक

एमपीसी न्यूज – पार्क केलेली रिक्षा चोरांनी चोरून नेण्याची घटना Chikhali)  रुपीनगर, चिखली येथे बुधवारी (दि.1) रात्री घडली. अवघ्या एक तासात ही चोरीची  घटना घडली. आरोपीला चिखली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Dehuroad : स्वतःच्याच पेन्शनचे पैसे मागायला गेलेल्या सासऱ्याला सून व तिच्या घरच्यांकडून मारहाण

गौरव अनिल सरोदे (वय 26 रा.रुपीनगर तळवडे) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी संतोष भाऊसाहेब भोसले (वय 29 रा.चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी पार्कींगमध्ये त्यांची (एमएच 14 जेपी9962) रिक्षा पार्क केली होती. आरोपीने पार्कींगमधून रात्री दहा ते अकरा या कालावधीत अवघ्या एक तासात 1 लाख रुपयांची रिक्षा चोरून नेली.

फिर्यादी यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. चिखली पोलीस पुढील तपास ( Chikhali) करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.