Hinjawadi : सोसायटीच्या पार्किंगमधून दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना शुक्रवारी (दि. 27) सकाळी आठच्या सुमारास गाडेनिया सोसायटी, विद्याव्हॅली रोड, सुसगाव येथे उघडकीस आली.

चंद्रकांत वसंत पाटील (वय 42, रा. गाडेनिया सोसायटी, विद्याव्हॅली रोड, सुसगाव) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चंद्रकांत यांनी त्यांची एम एच 12 / सी व्ही 9034 ही दुचाकी सोसायटीच्या पार्किंगमध्ये गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पार्क केली. रात्री अज्ञात चोरट्यांनी सोसायटीच्या पार्किंगमधून दुचाकी चोरून नेली. शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.