Hinjawadi : थांबलेल्या बसमधून 30 लाखांचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज – बेंगलोर-मुंबई महामार्गावर पुनावळे येथे एका हॉटेलसमोर बस थांबली असता कार मधून आलेल्या दोघांनी बसमधून 30 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि हिरे चोरून नेले. ही घटना गुरुवारी (दि. 14) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली.

दीपक पुरुषोत्तमलाल सैनी (वय 24, रा. राणीगंज, सिकंदराबाद, तेलंगणा) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात दोन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सिकंदराबाद येथील भवानी एअर लॉजिस्टिक या कुरिअर कंपनीत मागील दोन वर्षांपासून काम करतात. ही कंपनी सोन्याचे दागिने, हिरे एका व्यापा-याकडून दुस-या व्यापा-याला कुरिअरच्या माध्यमातून पोहोचवते. एक कुरिअर घेऊन फिर्यादी सिकंदराबादहून मुंबईला खासगी ट्रॅव्हल्स बसने (के ए 41 / ए 7777) जात होते. गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास बस पुनावळे येथे सागर हॉटेल समोर थांबली.

त्यावेळी एका कारमधून आलेल्या दोघांनी बसमध्ये दीपक यांच्या सीटखाली ठेवलेल्या बॅगमधील 30 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि हिरे चोरून नेले. याबाबत सोमवारी (दि. 18) हिंजवडी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.