Hinjawadi : कार्ड इन्शुरन्स कॅन्सल करण्याच्या बहाण्याने पावणे दोन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – क्रेडीट कार्ड इन्शुरन्स (Hinjawadi) असून तो कॅन्सल करण्याच्या बहाण्याने एका महिलेची एक लाख 80 हजारांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 7 ऑगस्ट 2023 रोजी हिंजवडी येथे घडली.

याप्रकरणी महिलेने 9093216064 या मोबाईल क्रमांक धारकाच्या विरोधात सोमवारी (दि. 6) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना अनोळखी व्यक्तीने फोन केला. फोनवरील व्यक्तीने तो कोटक महिंद्रा बँक, मुंबई येथून बोलत असल्याचे फिर्यादीस सांगितले. ‘तुमच्याकडे जे क्रेडीट कार्ड आहे, त्यावर कार्ड इन्शुरन्स आहे. त्यासाठी तुमच्या कार्डवरून प्रत्येक महिन्याला दोन हजार 950 रुपये चार्ज लागेल.

Chinchwad : अश्लील शेरेबाजी करत महिलेचा विनयभंग करणाऱ्याला पोलिसांनी घेतले ताब्यात

ते कॅन्सल करायचे असेल तर मी कॅन्सल करून देतो, असेही आरोपीने सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांना विश्वासात घेऊन (Hinjawadi) गोपनीय माहिती घेत कोटक महिंद्रा बँकेच्या क्रेडीट कार्डवरून एक लाख 80 हजार रुपये काढून घेत फिर्यादीची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.