Chinchwad : अश्लील शेरेबाजी करत महिलेचा विनयभंग करणाऱ्याला पोलिसांनी घेतले ताब्यात

एमपीसी न्यूज – कंपनीत कामावर जाताना व घरी जाताना ( Chinchwad) महिलेला अश्लील शेरेबाजी करत तसेच पाठलाग करत विनयभंग करणाऱ्या रोड रोमिओला चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. हा सर्व प्रकार फेब्रुवारी 2023 पासून आज पर्यंत चिंचवड येथे विविध ठिकाणी घडला.

विशाल दिलीप पैठणे (वय 27 रा भोसरी) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात पीडीतेने फिर्याद दिली आहे.

Wakad : विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्या प्रकरणी महाविद्यालयाकडून खंत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने  ( Chinchwad) पीडितेच्या काम करत असलेल्या कंपनीत, कंपनीच्या गेटवर कॅन्टीन, बस स्टॉप अशा वेगवेगळ्या ठिकाणी जात अश्लील शेरेबाजी करणे, मोठ मोठ्याने बोलणे, पाठलाग करणे, मला काही होणार नाही असा दम देणे अशा प्रकारे पिडीतेचा विनयभंग केला.

त्याच्या या छळाला कंटाळून अखेर पीडीतेने चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. चिंचवड पोलीस याचा पुढील तपास करत आहेत .

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.