Wakad : विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्या प्रकरणी महाविद्यालयाकडून खंत

एमपीसी न्यूज – लोणावळा येथे आउटडोर मॅनेजमेंट ट्रेनिंगसाठी गेलेल्या(Wakad) विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याची घटना सोमवारी (दि. 6) वाकड येथील आयआयईबीएम इंडस बिजनेस स्कूल येथे उघडकीस आली. त्यानंतर या प्रकरणाबाबत महाविद्यालय प्रशासनाकडून खंत व्यक्त करण्यात आली आहे.

महाविद्यालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. जयसिंग मारवाह (Wakad)यांनी याबाबत लेखी निवेदनाद्वारे माहिती दिली. 4 नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजता कॉलेजकडून 250 विद्यार्थ्यांची लोणावळा जवळ आउटडोर मॅनेजमेंट ट्रेनिंगसाठी (ओएमटी) सहल आयोजित करण्यात आली. सन 2002 पासून संस्थेकडून अशा प्रकारच्या वार्षिक सहलीचे आयोजन केले जाते. ही सहल म्हणजे पदव्युत्तर पदवीच्या शिक्षणाचाच एक भाग आहे. अशा प्रकारच्या सहलीमध्ये विद्यार्थ्यांना नेतृत्व, समन्वय, संघ बांधणी अशी कौशल्ये आत्मसात करता येतात.

Chinchwad : एक वर्षापासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला अटक

यावर्षीच्या सहलीमध्ये कोंढाणे गुफा ते (उधेवाडी) राजमाची सुमारे सहा किलोमीटर हा प्रवास विद्यार्थ्यांनी पायी केला. त्यानंतर पुढील प्रवास विद्यार्थ्यांनी टॅक्सीने केला. सहलीवरून परत येत असताना चार विद्यार्थ्यांना किरकोळ त्रास जाणवला. काही विद्यार्थ्यांना अशक्तपणा व चक्कर येणे अशी लक्षणे आढळली. त्रास होणा-या विद्यार्थ्यांवर लोणावळा येथे प्राथमिक उपचार केले.

सहलीच्या दुसऱ्या दिवशी रविवारी (दि. 5) कुणालाही कसलाही त्रास झाला नाही. सोमवारी (दि. 6) सकाळी सर्व विद्यार्थी महाविद्यालयात आले. प्रार्थना सुरु असताना सर्व विद्यार्थी हजर होते. त्यानंतर काही जणांना चक्कर येऊ लागली. महाविद्यालय प्रशासनाने तत्काळ विद्यार्थ्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. तिथे तपासणी आणि उपचार केल्यानंतर सोमवारी सायंकाळी सहा वाजता विद्यार्थ्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती ठणठणीत आहे.

ट्रेकमध्ये सहभागी नसलेल्या विद्यार्थ्यांना देखील त्रास झाला आहे. ही संशयास्पद बाब आहे. आयआयईबीएम महाविद्यालयाच्या इतिहासात आजवर असे प्रकार घडलेले नाहीत. अशी घटना प्रथमच घडली असून याबाबत महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने डॉ. मारवाह यांनी खंत व्यक्त केली. तसेच भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत, याची खबरदारी घेण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे.

अतिदक्षता विभागात दाखल केल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण

त्रास झालेल्या विद्यार्थ्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्या रुग्णालयात जनरल बेड शिल्लक नसल्याने काही विद्यार्थ्यांना अतिदक्षता विभागातील बेडवर ठेवण्यात आले. हे पाहून काही पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर झाल्याची चर्चा झाल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र बेड शिल्लक नसल्याने तशी तात्पुरती व्यवस्था केल्याचे रुग्णालयात प्रशासनाने सांगताच सर्वांचा जीव भांड्यात पडला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.