Thergaon : दिवाळीनिमित्त नाना काटे सोशल फाऊंडेशन तर्फे अनाथ आश्रमातील मुलांना कपडे वाटप

एमपीसी न्यूज – नाना काटे सोशल फाऊंडेशन व श्री फाउंडेशनच्या वतीने ओम श्री साई मतिमंद अनाथ आश्रम व स्ंदन बाल आश्रम थेरगाव (Thergaon) येथील 18 वर्षाखालील 150 मुला-मुलींना दिवाळी सणानिमित्त मुलांच्या मनपसंतीनुसार कपडे, खाऊ,व दैनंदिन वापराच्या वस्तू खरेदी करून देण्यात आले.

Hinjawadi : कार्ड इन्शुरन्स कॅन्सल करण्याच्या बहाण्याने पावणे दोन लाखांची फसवणूक

या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत असलेला दिसून येत होता. यावेळी माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक नाना काटे, (Thergaon) फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागर पाडाळे, श्री ओम साई मतिमंद मुलांची आश्रम भुगाव ,स्पंदन बाल आश्रम थेरगाव अध्यक्ष मनोज मस्के, उद्योजक उमेश काटे, साद सामाजिक संस्था, विकास पवार, निसार शेख, महेश जाधव, विकास मुंगवडे, कमांडो मनोज साळवी, फ्लाईंग वूमनच्या अध्यक्षा छाया देसले व इतर मान्यवर व संस्थेचे सभासद आदी उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.