Hinjawadi : हिंजवडी पोलिसांना पकडला 31 किलो गांजा

एमपीसी न्यूज – हिंजवडी पोलिसांनी 31 किलो गांजा पकडला. गांजाची (Hinjawad)वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा लाऊन ही कारवाई केली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

मैनुद्दीन अब्दुल सत्तार (वय 23, रा. हिंजवडी. मूळ रा. बिहार), बिपलभ बिधन राणा (वय 24, रा. हिंजवडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

Pimpri : भाजी मंडईत ‘प्लास्टिक प्रदूषण विरुद्ध जागरूकता अभियान

पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी दिलेल्या(Hinjawad) माहितीनुसार, हिंजवडी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार रवी पवार यांना माहिती मिळाली की, वाकडकर वस्ती येथे एक व्यक्ती टेम्पो (एमएच 14/एचयु 2553) मधून गांजा विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार हिंजवडी पोलिसांनी वाकडकर वस्ती येथे सापळा लावला. वाकड ब्रिजकडून संशयित टेम्पो आला असता त्याला बाजूला घेऊन चौकशी करण्यात आली.

सुरुवातीला टेम्पो चालकाने टेम्पोमध्ये भाजीपाल्याचा कचरा असल्याचे सांगितले. मात्र पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी टेम्पोची झडती घेतली. त्यामध्ये गांजाचे 17 पुडे आढळून आले. 31 किलो 100 ग्राम गांजा आणि टेम्पो असा एकूण 14 लाख 38 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करत टेम्पो चालक आणि त्याच्या साथीदाराला अटक केली.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहायक आयुक्त डॉ. विशाल हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ, पोलीस निरीक्षक सुनील दहिफळे, सोन्याबापू देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक अजितकुमार खटाळ, सहायक फौजदार महेश वायबसे, पोलीस अंमलदार संतोष डामसे, रवी पवार यांनी केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.