Pimpri : भाजी मंडईत ‘प्लास्टिक प्रदूषण विरुद्ध जागरूकता अभियान

एमपीसी न्यूज – बॉश चेसिस सिस्टम्स इंडिया प्राईवेट लिमिटेड (Pimpri )व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका , सी.एस.आर सेल यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी भाजी मंडई येथे ‘प्लास्टिक प्रदूषण विरुद्ध जागरूकता अभियानास सुरवात करण्यात आली.

प्लास्टिक बंदी असताना प्लास्टिक पिशव्यांचा होणारा (Pimpri )वाढता वापर तसेच, प्लास्टिकचा पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम यावर उपाय म्हणून बॉश इंडिया सामाजिक उत्तरदायित्वाअंतर्गत ही मोहीम राबवण्याचे ठरवण्यात आले आहे. प्लास्टिक प्रदूषणाच्या हानिकारक प्रभावांबद्दल जागरूकता वाढवणे आणि कापडी पिशव्यांसारख्या पर्यावरणपूरक पर्यायांच्या वापरास प्रोत्साहन देणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.

Khed : पीएमपीएल चालकाला बस थांबून मारहाण केल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा दाखल

या कार्यक्रमात 40 पेक्षा जास्त स्वयंसेवकांचा उत्साहपूर्ण सहभाग दिसला. पथनाट्य, घोषणांच्या माध्यमातून प्लास्टिक प्रदूषणाचा पर्यावरण व मानवी आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकण्यात आला. तसेच या कार्यक्रमात भाजी घेण्यासाठी आलेल्या प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या 750 पेक्षा जास्त ग्राहकांना मोफत कापडी पिशव्यांचे वाटप करून प्लास्टिक पिशवी न वापरण्यासाठी शपथ देण्यात आली.

स्वच्छ आणि आरोग्यदायी पर्यावरणासाठी प्लास्टिकचा वापर कमी करणे आणि पर्यावरणपूरक पद्धतींचा अवलंब करण्याच्या आवश्यकतेबद्दल या कार्यक्रमाने यशस्वीरित्या जागरूकता निर्माण केली. अशाच प्राकारे जनजागृतीपर कार्यक्रम राबवण्याची मोहीम बॅश ने हाती घेतली आहे.

या कार्यक्रमास बॉश चे अधिकारी रावलनाथ पाटील, युनियन अध्यक्ष अजित आल्हाट, व सदस्य, कर्मचारी अपू शहा, सुरज जाधव, अश्रफ शेख व इतर कंपनी कर्मचारी तसेच पिंपरी लाल बाहादूर शास्त्री भाजी मंडई समितीचे सदस्य लल्लू बोराटे, माउली विटकर, शिवाजी शिरसाठ, शिवाजी कुदळे, रखमाजी टोणपे व इतर सर्व सदस्य उपस्थित होते. या उपक्रमाचे मंडई समिती सदस्यांनी कौतुक केले व भविष्यात वारंवार असे कार्यक्रम राबविण्याचे आवाहन कंपनीस यावेळी करण्यात आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.