Hinjawadi : अवघ्या पाउण तासात कारच्या काचा फोडून ऐवज पळवला

एमपीसी न्यूज – अवघ्या पाउण तासाच्या कालावधीत (Hinjawadi) एका चोरट्याने कारच्या काचा फोडून कारमधून लॅपटॉप, मोबाईल, रोख रक्कम, चांदीची मूर्ती असा ऐवज चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 3) दुपारी एक ते पावणे दोन वाजताच्या कालावधीत ताथवडे येथे घडला.

राजू प्रधान राठोड (वय 44, रा. डुडुळगाव, ता. हवेली) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chikhali : मोबाईल नंबर ब्लॉक केल्याने त्याने गुगल पे, फोन पेवर मेसेज करत केला महिलेचा विनयभंग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची कार ताथवडे येथील एक्सेल शोरूम समोर पार्क केली. फिर्यादी त्यांच्या कामानिमित्त शोरूम मध्ये गेले. त्यांचे काम संपवून फिर्यादी पाउण तासाने आले असता त्यांच्या कारच्या काचा फोडलेल्या आढळून आले. फिर्यादी यांनी कारमध्ये ठेवलेला लॅपटॉप, मोबाईल फोन रोख रक्कम आणि चांदीची मूर्ती असा एकूण 58 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज चोरट्याने चोरून नेल्याचे उघडकीस आले. हिंजवडी पोलीस तपास करीत (Hinjawadi) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.