Hinjawadi : स्पा सेंटरमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा

एमपीसी न्यूज – हिंजवडी-वाकड रोडवरील लूमिनस स्पामध्ये (Hinjawadi) सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने छापा मारून कारवाई केली. यामध्ये दोन महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 21) करण्यात आली.

राहुल नवनाथ कांगणे (वय 28, रा. सुतारवस्ती, माण. पुणे. मूळ रा. कुणकी, ता. जळकोट, लातूर) याच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलींना स्पाच्या नावाखाली जास्त पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी लुमिनस स्पा या ठिकाणी छापा मारून कारवाई केली. यामध्ये आरोपी राहुल कांगणे याच्या ताब्यातून दोन मुलींची सुटका करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) सतीश माने यांच्या (Hinjawadi) मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे, धैर्यशील सोळंके, विजय कांबळे, पोलीस अंमलदार भगवंता मुठे, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, संगीता जाधव, रेश्मा झावरे, सोनाली माने यांनी केली.

Pune Rain : पुण्यात 24 जूनला होणार पावसाचे आगमन; तर 29 जूनला पडणार मुसळधार पाऊस

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.