Alandi : श्री ज्ञानेश्वर विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज : 21 जून हा जगभरात योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याप्रमाणे आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यामध्ये इयत्ता 5 वी ते 12 विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे योग दिनाचे महत्त्व सांगण्यात आले.

तन्वी खेडकर व नेहा खेडकर यांनी प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थी जीवनात योगाचे महत्त्व पटवून दिले. तसेच विद्यार्थ्यांचा सहभाग घेत योगा करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना प्रेरित केले.

यावेळी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक सूर्यकांत मुंगसे, पर्यवेक्षक किसन राठोड, प्रशांत सोनवणे, अनिता गावडे, क्रीडा विभाग प्रमुख श्रीरंग पवार, पी. टी. शिक्षक राजश्री भुजबळ, वाय. एस. कांबळे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीरंग पवार यांनी केले व सूत्रसंचालन मनीषा पवार यांनी केले.याबाबत माहिती गुट्टे सर यांनी दिली.

Hinjawadi : स्पा सेंटरमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.