Pune Rain : पुण्यात 24 जूनला होणार पावसाचे आगमन; तर 29 जूनला पडणार मुसळधार पाऊस

एमपीसी न्यूज : जून महिना संपत आला तरीही पावसाचे (Pune Rain) हवे तसे आगमन झालेले नाही. हवामान अंदाजानुसार पुणे-मुंबईत 17 जूनपासून पाऊस सुरू होणार होता. परंतु, अजूनही पावसाची लक्षणे दिसलेली नाही. आता हवामान खात्याने पुण्यात 24 जून पासून पाऊस सुरू होण्याचे संकेत दिले आहेत. तर 24 जून नंतर पाऊस हळूहळू वाढणार असून 28 जून ते 29 जून दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.  

IMD-GFS च्या ताज्या अंदाजानुसार, 25 जूनपासून पुण्याच्या घाटांवर मुसळधार पाऊस पडणार आहे. तसेच, 24 जूनपासून पावसाचा वेग वाढणार असल्याने नागरिकांनी आपल्या सुरक्षतेसाठी आतापासूनच तयारी लागण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 24 जून पासून 29 जून पर्यंत पुण्यात किती पाऊस पडणार याचा अंदाज भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेत कार्यरत असणारे  संशोधक विनीत कुमार यांनी वर्तवला आहे. तो पुढीलप्रमाणे –

IMD-GFS नुसार पुणे शहरासाठी पावसाचा ताजा अंदाज

24 जून: 7-10 मिमी
25 जून: 3-4 मिमी
26 जून: 4-5 मिमी
27 जून: 10-15 मिमी (Pune Rain)
28-29 जून: 20-25 मिमी

जूनमध्ये आतापर्यंत झालेला पाऊस –

पुणे (शिवाजीनगर) – 20.7 मिमी (सामान्यपेक्षा 85.3 मिमी कमी)
महाबळेश्वर – 102.4 मिमी (सामान्यपेक्षा 370.3 मिमी कमी)
नागपूर – 0 मिमी (सामान्यपेक्षा 90.8 मिमी कमी)

24/25 जूनपासून पुणे मुंबईत मान्सून दाखल होईल.

Maval : विहिरीत पडलेल्या सांबराला जीवदान

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.