Maval : विहिरीत पडलेल्या सांबराला जीवदान

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील नवलाख उंबरे येथे (Maval) विहिरीत पडलेल्या सांबराला सुरक्षित बाहेर काढून जीवदान देण्यात आले. मंगळवारी (दि. 21) रात्री विहिरीत पडलेले सांबर बुधवारी (दि. 21) दुपारी नैसर्गिक अधिवासात विसावले.

नवलाख उंबरे येथे डोंगराच्या पायथ्याला ठाकर वस्तीजवळ असलेल्या विहिरीत मंगळवारी रात्री एक सांबर पडले. याबाबत वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य विकी दौंडकर यांना गावातील नागरिकांनी माहिती दिली. दरम्यान वन विभागाकडून देखील संस्थेला माहिती देण्यात आली. त्यानुसार वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे, अध्यक्ष अनिल आंद्रे, विकी दौंडकर, अविनाश कारले, रमेश कुंभार, सत्यम सावंत, विनय सावंत, जिगर सोलंकी, सुरज शिंदे, शुभम काकडे, गणेश निसाळ, गणेश ढोरे यांनी नवलाख उंबरे गावाकडे धाव घेतली.

विहिरीतील पाण्यात सांबर पडले होते. त्याला जाळीच्या सहाय्याने एक (Maval) तासाच्या प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात आले. बाहेर काढल्यानंतर त्याची प्राथमिक तपासणी करण्यात आली. उपवन संरक्षक आशितोष शेंडगे, रेंज फॅारेस्ट अॅाफिसर हनुमंत जाधव, वनरक्षक मंगल दाते ढोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सांबराला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

ग्रामस्थांनी देखील या कामात रेस्क्यू टीमची मदत केली. गावात, परिसरात कुठेही वन्यप्राणी दिसल्यास वन विभागाला (1926) अथवा वन्यजीव रक्षक मावळ संस्थेला माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले.

Pavana River : दारूभट्टीवर अंमली पदार्थ विरोधी पथकाचा छापा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.