Pavana River : दारूभट्टीवर अंमली पदार्थ विरोधी पथकाचा छापा

एमपीसी न्यूज – शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पवना नदीच्या काठावर सुरु (Pavana River) असलेल्या एका दारूभट्टीवर अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा मारून कारवाई केली. त्यात पोलिसांनी साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला. ही कारवाई बुधवारी (दि. 21) दुपारी दोन वाजताच्या सुमारास शिरगाव येथे करण्यात आली.

कुंदन प्रकाश नानावत (रा. शिरगाव, ता. मावळ) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार रणधीर माने यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरगाव येथे पवना नदीच्या काठावर गावठी दारू बनवण्यासाठी भट्टी लावली असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून कारवाई करत साडेतीन (Pavana River) लाख रुपयांचे पाच हजार लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे रसायन नष्ट केले. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.

Pimple Gurav : ‘अभंगाची मूल्यगंगा’ व ‘सारांश लेखन एक कला’ या ग्रंथांचे रविवारी प्रकाशन

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.