Pimple Gurav : ‘अभंगाची मूल्यगंगा’ व ‘सारांश लेखन एक कला’ या ग्रंथांचे रविवारी प्रकाशन

एमपीसी न्यूज – प्रा. संपत गर्जे लिखित ‘अभंगाची मूल्यगंगा’ व ‘सारांश लेखन एक कला’ या ( Pimple Gurav) ग्रंथांचा प्रकाशन समारंभ येत्या रविवारी (दि.25) सकाळी साडेदहा वाजता आयोजित करण्यात आला असून, हा समारंभ पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृह येथे होणार आहे.

‘सारांश लेखन एक कला’ या पुस्तकाचे प्रकाशन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांच्या हस्ते, तर ‘अभंगाची मूल्यगंगा’ या पुस्तकाचे प्रकाशन 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवानंद स्वामी महाराज व अध्यक्षस्थानी डॉ. श्रीपाल सबनीस असणार आहेत. यावेळी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ बालभारतीचे शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील, उद्योजक विजय ( Pimple Gurav) जगताप, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर, भारतीय जैन संघटनेचे शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्प अधिकारी सुरेश साळुंके, एससीईआरटी’चे योगेश सोनवणे, महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे विजय भदाणे, भारतीय जैन संघटना विद्यालय वाघोलीचे प्राचार्य संतोष भंडारी, भारतीय जैन संघटना विद्यालय पिंपरीचे प्राचार्य दिलीपकुमार देशमुख, भारतीय जैन संघटना प्राथमिक विद्यालय पिंपरीचे मुख्याध्यापक संजय जाधव, माजी नगरसेविका आशाताई शेंडगे, मुखपृष्ठकार रेखाताई भदाणे, मुखपृष्ठकार अरविंद शेलार, परिस पब्लिकेशन्सचे प्रकाशक गिरीश भांडवलकर, पांडुरंग पवार, राजेंद्र कोकणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पुस्तकाचे लेखक संपत गर्जे यांनी दिली.

 

Pimpri : एमआयडीसीने दिलेल्या ‘त्या’ नोटीसा रद्द करा, लघुउद्योग संघटनेचे उद्योगमंत्र्यांकडे मागणी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.