Pimpri : एमआयडीसीने दिलेल्या ‘त्या’ नोटीसा रद्द करा, लघुउद्योग संघटनेचे उद्योगमंत्र्यांकडे मागणी

एमपीसी न्यूज – एमआयडीसीने दिलेल्या विविध सेवांकरिता (Pimpri) प्लॉट धारकांनी भरलेल्या रक्कमेवर अचानकपणे सहा वर्षानंतर जीएसटी व त्यावरील व्याजाची मागणी पाण्याच्या बिलाद्वारे वसूल करण्याचा घाट घातला आहे. जो अयोग्य, अन्यायकारक व बेकायदेशीर आहे. एमआयडीसीने केलेल्या चुकीच्या भुर्दंडाचा भार हा प्लॉट धारक लघुउद्योजक सहन करू शकणार नाही. त्यामुळे एमआयडीसीने दिलेल्या सर्व नोटीसा मागे घ्याव्यात अशी मागणी उद्योजकांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली.

पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी उद्योगमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जीएसटी इंटेलिजन्स पथकाच्या सुचनेनंतर एमआयडीसीला अचानकपणे जाग आल्याने एमआयडीसीने 1 जून रोजी रोजी परिपत्रक जरी केले. 1 जुलै 2017 ते 4 सप्टेंबर 2022 या पाच वर्षातील एमआयडीसीने दिलेल्या विविध सेवांकरिता प्लॉट धारकांनी भरलेल्या रक्कमेवर अचानकपणे सहा वर्षानंतर GST व त्यावरील व्याजाची मागणी पाण्याच्या बिलाद्वारे वसूल करण्याचा घाट घातला आहे.

जो अयोग्य, अन्यायकारक व बेकायदेशीर आहे. त्यामुळे उद्योजकांना मोठा धक्काच बसला आहे. एमआयडीसीने केलेल्या चुकीच्या भुर्दंडाचा भार हा प्लॉट धारक लघुउद्योजक सहन करू शकणार नाही. त्यामुळे एमआयडीसीने दिलेल्या सर्व नोटीसा मागे घ्याव्यात.

अशा प्रकारच्या कोणत्याही दिलेल्या सेवेवरील GST बिल एमआयडीसीतर्फे (Pimpri) पूर्वी कधीही पाठवले गेले नाही. न आकारलेला GST कर व त्यावरील व्याज भरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही अशी भावना सर्व औद्योगिक संघानेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोंकण, नाशिक, पुणे विभागातील सुमारे 40 औद्योगिक संघटनांच्या 20 जून रोजी दृकश्राव्य माध्यमातून झालेल्या बैठकीत एकमताने ह्या विषयाला विरोध करण्यात आला आहे.

Pimpri : मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सव यंदा विविध उपक्रमांनी साजरा होणार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.