Moshi : टास्कच्या बहाण्याने व्यक्तीची 76 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – टास्क पूर्ण करण्याच्या बहाण्याने 76 लाखांची फसवणूक (Moshi) केल्याची घटना मोशी येथे उघडकीस आली आहे. ही घटना 19 मे ते 9 जून या कालावधीत घडली.

शशिकांत नागनाथ पाटील (वय 37, रा. मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 9732928958 क्रमांक धारक सान्वी (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), टेलिग्राम आयडी 39451937 धारक ज्योती (पूर्ण नाव पत्ता नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना संपर्क करून त्यांचा विश्वास संपादन केला. युट्युब चॅनल सबस्क्राईब करून टास्क पूर्ण केल्यास भरपूर पैसे मिळतील असे फिर्यादीस आमिष दाखवण्यात आले. त्यासाठी फिर्यादीकडून वारंवार 76 लाख 24 हजार 213 रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Pavana River : दारूभट्टीवर अंमली पदार्थ विरोधी पथकाचा छापा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.