Hinjawadi : तरुणाला मारहाण करून लुटणाऱ्या आरोपीस अटक

एमपीसी न्यूज – पायी जाणाऱ्या तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून आणि मारहाण करून लुटले. ही घटना हिंजवडी येथे हॅाटेल बारबेक्यूच्या गेटवर गुरुवारी (दि. 27) पहाटे दीडच्या सुमारास घडली. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

सोहेल इस्माईल शेख (वय 19, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सुमेन महेरा करेजी (वय 22 रा. लक्ष्मी चौक, हिंजवडी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमेन गुरुवारी पहाटे दीडच्या सुमारास हॅाटेल बारबेक्यू येथून पायी चालत जात असताना आरोपी शेख हा दुचाकीवरुन आला व त्याने चाकुने व लाकडी बांबूने मारहाण करीत सुमेन यांच्या कडील पाकीट व त्यातील पाचशे रुपये व कागदपत्रे चोरून नेले. सुमेन यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. 27) तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपीला अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.