Hinjawadi : पतीचे महिलेवर अनैसर्गिक अत्याचार; सासरच्यांवरही मारहाणीचा गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : पतीने अनैसर्गिक अत्याचार करून (Hinjawadi) सासरच्यांनी शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना नांदे गावात घडली.

याबाबत पीडित 28 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पती, सासू, जाऊ व दिर यांच्याविरुद्ध भारतीय कलम 498(अ), 377, 323, 504, 506, 34 अन्वये हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना मे 2021 ते 29 एप्रिल 2022 पर्यंत नांदे येथील फ्लॅटमध्ये घडली.

मे 2021, ते 29 एप्रिल 2022 पर्यंत आरोपींनी संगणमताने फिर्यादीस  शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. तसेच शारीरिक, मानसिक छळ केला. पतीने फिर्यादीला तिच्या मोबाईलमधील अश्लील चित्र बळजबरीने बघण्यास सांगितले असता फिर्यादीने त्यांना नकार दिला.

Political Article : राजकीय पक्ष आता जनतेची चळवळ व्हावी!

त्यावेळी त्यांनी फिर्यादीला मारहाण करून बळजबरीने शरीर (Hinjawadi) संबंध ठेवले. या प्रकरणी सासरच्या सर्व कौटुंबिक सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.