Pimpri : पार्किंगमध्ये वाढदिवस साजरा करणार्‍या कुटुंबाला मारहाण

एमपीसी न्यूज – इमारतीच्या पार्किंगमध्ये मुलीचा वाढदिवस साजरा करणार्‍या कुटुंबाला सात जणांच्या टोळक्याने शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच एकाच्या डोक्यात कोयत्याने वार केला. हा प्रकार मिलिंदनगर येथील सम्राट अशोक हौसिंग सोसायटीमध्ये गुरूवारी रात्री साडेअकरा वाजता घडला.

याप्रकरणी राजेश अण्णा पवार (वय-24, रा. सम्राट अशोक हौसिंग सोसायटी, मिलिंदनगर, पिंपरी) याने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोहित वाघमारे (वय-27), राकेश वाघमारे (वय-30), रोहन खंडागळे (वय-24), देवी आनंद नायडू (वय-45), पुजा आनंद नायडू (वय-23), शुभांगी आनंद नायडू (वय-21), भावना आनंद नायडू (वय-19, सर्व रा.  व्हि बिल्डिंग, मिलिंदनगर, पिंपरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेश याची बहिण पुनम हिचा शुक्रवारी वाढदिवस होता. राजेशच्या कुटुंबातील सर्व मंडळी इमारतीच्या पार्किंगमध्ये वाढदिवस साजरा करत होते. यावेळी आलेल्या आरोपींनी काय आरडा-ओरड सुरू असल्याचे म्हणत शिवीगाळ केली. तर, एकाने राजेशच्या डोक्यात कोयत्याने वार केले. तलवारीचा धाक दाखवून लाथाबुक्यांनी राजशचे वडील, बहिण, चुलत भावाला मारहाण केली.  पिंपरी ठाण्याचे फौजदार निकम तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.