Akurdi : काळभोरनगरमध्ये 63 हजार रुपयांची घरफोडी

एमपीसी न्यूज – घराचा दरवाजा कुलूप लावून बंद असताना चोरट्यांनी कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. शयनगृहातील कपाटातील मंगळसूत्र, अंगठ्या, कर्णफुले असे 63 हजार रूपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. हा प्रकार काळभोरनगर येथील सुर्योदय कॉम्पलेक्समध्ये शुक्रवारी उघडकीस आली.

याप्रकरणी शब्बीर मकबुल मुल्ला (वय-53, रा. सुर्यादय कॉम्पलेक्स, काळभोरनगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फौजदार सिरसाठ तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.