BNR-HDR-TOP-Mobile

निसर्गाच्या सान्निध्यात सर्व सोयीसुविधांनी युक्त सदनिका – निसर्गस्पर्श

एमपीसी न्यूज- सध्याच्या धकाधकीच्या जीवनात दिवसभर काम करुन थकून संध्याकाळी घरी आल्यावर आपल्याला निसर्गाचा सहवास हवाहवासा वाटतो. या घटका दोन घटका निसर्गरम्य वातावरणात काढता आल्या की दिवसभराचा सगळा थकवा कुठच्या कुठे पळून जातो. लोकांची हीच गरज ओळखून नव्याने विकसित होणा-या वडगाव मावळ येथे आर्य निसर्ग प्रॉपर्टीजच्या वतीने निसर्गस्पर्श या प्रकल्पात एक व दोन बेडरुम किचनच्या ९० फ्लॅटस समावेश करण्यात आला आहे.

कुटुंबातील आबालवृद्धांना कृतार्थतेची जाणीव करुन देणा-या, लहानग्यांना निसर्गाचे सान्निध्य देणा-या आणि तरुणाईला भुरळ पाडणा-या निसर्गाचा शेजार देणा-या या सदनिका पाहताक्षणीच तुम्हाला खूष करुन टाकतील. शहराच्या गोंगाट गजबजाटापासून दूर शुद्ध हवा, पाणी, मोकळा झुळझुळणारा वारा देणारा निसर्ग या निसर्गस्पर्श प्रकल्पात आहे. वडगाव मावळ येथे आता सुंदर संकुले उभारली जात आहेत. शहराच्या जवळ पण शहराचा गोंगाट नाही, सर्व सोयीसुविधांनी युक्त अशा या एक व दोन बेडरुम किचनच्या सदनिका येथे उपलब्ध आहेत.

याशिवाय येथे अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. क्लब हाऊस म्हणजेच बहुउद्देशीय हॉल, लिफ्ट व कॉमन भागात बॅटरी बॅकअप, मुलांच्या खेळण्यासाठी जागा व लॅन्डस्केप गार्डन, ज्येष्ठ नागरिकांसाठी जागा, सोलर वॉटर, फायर फायटिंग सिस्टिम, रेन वॉर हार्वेस्टिंग अशा सध्याच्या आधुनिक काळाला अनुसरुन सर्व अत्यावश्यक सुविधा या निसर्गस्पर्श प्रकल्पात देण्यात आल्या आहेत. तसेच दैनंदिन गरजेच्या सर्व सुविधा म्हणजे शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, बॅंक,बाजारपेठ, बसस्टॅंड येथून जवळच आहेत. तसेच द्रुतगती महामार्ग, जुना मुंबई – पुणे महामार्ग, तळेगाव, चाकण, हिंजवडी येथून जवळच आहेत. तसेच पवना धरण, लोणावळा, कार्ले – भाजेची लेणी, प्रतिशिर्डी शिरगाव, देहू, आळंदी यासारखी तीर्थक्षेत्रे येथून सहजगत्या जाता येण्यासारख्या अंतरावर आहेत. निसर्गस्पर्श हा खरंच सुखद स्पर्श आहे.

पत्ता – निसर्गस्पर्श,
सर्व्हे नं. 181/2, संस्कृती बंगलो सोसायटीजवळ, न्यू इंग्लिश स्कूलमागे,
वडगाव मावळ, पुणे.
Email- [email protected]

बुकींगसाठी संपर्क – 7722006664

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement