Alandi : आळंदीत 27 जूनला शासन आपल्या दारी या अभियानाचे आयोजन: नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा आळंदी शहर राष्ट्रवादीचे आवाहन

एमपीसी न्यूज : आळंदी (Alandi) येथील फ्रुटवाला धर्मशाळेमध्ये दि 27 जून रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत महाराजस्व अभियान अंतर्गत शासन आपल्या दारी या अभियानाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदी शहर राष्ट्रवादीने आयोजन केले आहे.

Pune : आयुष मंत्रालयाच्या मान्यतेने विद्यार्थी साहाय्यक समितीमध्ये योगशिक्षक प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करणार : गायकवाड

सरकारी योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचाव्यात, सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांचे अडलेले प्रश्न, समस्या मार्गी लागाव्यात, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता व्हावी, अशा विविध हेतूंना पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री शासकीय योजना गतिमान अंमलबजावणी अभियान अंतर्गत शासन आपल्या दारी महाराजस्व अभियानाचे आयोजन करण्यात येत असून हा सर्वसामान्य जनतेसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे.

या अभियाना अंतर्गत मिळणार या सुविधांचा लाभ:-
*• नवीन आधार कार्ड काढणे / दुरुस्ती करणे*
*• शिधापत्रिकेवरील नाव कमी करणे, नाव वाढविणे*
*• जीर्ण / खराब शिधापत्रिका बदलणे*
*• संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत*
*• सामाजिक विशेष साहाय्य योजना विधवा / दीर्घकालीन आजार / दिव्यांगांसाठीच्या योजना*
*• उत्पन्नाचा दाखला जात प्रमाणपत्र*
*• श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना*
*• इंदिरा गांधी वृद्धापकाळ / विधवा / दिव्यांग*
*• रहिवासी दाखला*
*• प्रधानमंत्री उज्वला योजना*
*• प्रधानमंत्री मातृ वंदना योजना*
*• राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना*
*• दिव्यांगांसाठी अपंगत्व प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन फॉर्म भरणे*
*• पंतप्रधान आवास योजना शहरी*
*• पंतप्रधान स्वधिनी योजना*
*• दिव्यांगांसाठी UDID कार्ड नोंदणी करणे*
*• जन्म प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र*
*•एस.टी. पास जेष्ठ नागरिक दिव्यांगांसाठी*
*• नवीन वीज कनेक्शन घरगुती*
*• कोविड प्रतिबंधक लसीकरण*
*• नवीन मतदार नोंदणी करणे*
*• नवीन शिधापत्रिका अर्ज स्वीकृती* इ.
याबाबत माहिती आळंदी शहर राष्ट्रवादी यांनी दिली. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन आळंदी शहर राष्ट्रवादी तर्फे करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.