Pune : आयुष मंत्रालयाच्या मान्यतेने विद्यार्थी साहाय्यक समितीमध्ये योगशिक्षक प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करणार : गायकवाड

एमपीसी न्यूज – “विद्यार्थी साहाय्यक समिती व प्राचीन संहिता गुरुकुल यांच्या संयुक्त विद्यमाने आयुष मंत्रालयाच्या मान्यतेने योगशिक्षक हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम लवकरच सुरु करण्यात येणार आहे. समाजाचे स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी समितीमधून तयार झालेले योगशिक्षक योगाभ्यासाचे धडे देतील,” अशी माहिती समितीचे विश्वस्त तुकाराम गायकवाड यांनी दिली.

Pcmc : पिंपरी आणि आकुर्डी येथील तब्बल ९३८ घरांसाठी पालिकेने अर्ज मागविले

नवव्या जागतिक योग दिनानिमित्त विद्यार्थी साहाय्यक समितीच्या अ. शं. आपटे वसतिगृहात योग शिबीर आयोजिले होते. आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार योग प्रात्यक्षिके झाली. कबीर बाग मठ संस्थेच्या अनघा भिडे, विद्यार्थी साहाय्यक समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत कुलकर्णी, योग मार्गदर्शक दिनकर वैद्य, डॉ. अभय व्यवहारे आदी उपस्थित होते.

तुषार रंजनकर म्हणाले, “समितीमध्ये गेल्या ४० वर्षांपासून विद्यार्थी नियमीत योगासने करतात. आमच्या संस्थेमध्ये योग हा अनिवार्य उपक्रम आहे. अनेक विद्यार्थ्यांनी योगाभ्यासात नैपुण्य प्राप्त केलेले आहे. समितीच्या मुलींच्या व मुलांच्या वसतिगृहात रोज सकाळी योग व प्राणायाम केला जातो. त्यामुळे समितीतील विद्यार्थ्यांचे आरोग्य सदैव चांगले असते.”

विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सादर केलेल्या आकर्षक योग प्रात्यक्षिकांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. अनघा भिडे यांनी योगाचे महत्व व योगोपचार याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दिनकर वैद्य यांनी योगाची प्रात्यक्षिके घेतली व करून दाखवली. डॉ. अभय व्यवहारे यांनी सूत्रसंचालन केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.