Pune News : आठवणींना उजाळा अन यशाचं कौतुक

एमपीसी न्यूज : वसतिगृहातील जुन्या आठवणी… केलेल्या कमवा व शिका, चार तास काम… सांस्कृतिक कार्यक्रमांत केलेली मौज मस्ती… वेगवेगळ्या क्षेत्रांत (Pune News) मिळवलेल्या यशाचं कौतुक आणि आज करीत असलेल्या कामाची, मुलाबाळांची माहिती एकमेकांना सांगताना, एकत्रित स्नेहभोजनाचा आस्वाद घेताना, पुन्हा एकदा स्मरणरंजन करताना चेहर्‍यावरचा विलक्षण आनंद ओसंडून वाहत होता.

निमित्त होते, विद्यार्थी साहाय्यक समितीच्या माजी विद्यार्थी मंडळाच्या वतीने आयोजित 34 व्या माजी विद्यार्थी मेळाव्याचे. या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी अमोल शहाणे, तर अध्यक्षस्थानी ज्येष्ठ माजी विद्यार्थी प्रसाद रायकर होते. याप्रसंगी समितीचे अध्यक्ष प्रतापराव पवार, कार्यकारी विश्वस्त तुकाराम गायकवाड, मंडळाचे अध्यक्ष राजू इंगळे आदी उपस्थित होते.

मेळाव्याच्या निमित्ताने कृतज्ञता व्यक्त करताना ज्येष्ठ कार्यकर्ते व कर्मचार्‍यांचा सत्कार करण्यात आला. कार्यकर्त्या सुहासिनी बिवलकर, कर्मचारी संगीता गारवे यांना, तसेच देणगीदार राजेंद्र गायकवाड यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. अरुण कोंडेजकर, ऍड. दौलत इंगवले, रत्नाकर मते व अरविंद औताडे (Pune News) पुरस्कृत आदर्श विद्यार्थी-विद्यार्थिनी पुरस्कार वितरित करण्यात आले. स्वर्गीय रमाकांत तांबोळी व समिती परिवारातील निधन झालेल्या इतर सदस्यांना आदरांजली वाहण्यात आली. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले.

Pune News : प्रेयसीचा नग्न व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणीची मागणी

यंदाच्या मेळाव्याचे प्रायोजकत्व मुंबई व कोकण विभागातील माजी विद्यार्थ्यांकडे होते. मंडळाचे सचिव सुनील चोरे, सहसचिव मनीषा गोसावी, खजिनदार संतोष घारे, सहखजिनदार गणेश काळे, मुंबई व कोकण टीममधील समन्वयक अरविंद औताडे, संजीव पाध्ये, दिनकर वैद्य, मंडळाचे सदस्य जिभाऊ शेवाळे, निसार चौगुले, डॉ. अभय व्यवहारे, मनोज गायकवाड, अलकनंदा पाटील, देविदास टिळे, शंकर बारवे, रेवती गटकळ कार्यालयीन सहायक गणेश ननवरे मेळावा यशस्वी करण्यात कठोर परिश्रम घेतले.

प्रसाद रायकर म्हणाले, “समितीने आपल्याला घडवले. जीवन मूल्यांची शिकवण देणारी ही संस्था आहे. समाजाला आपण काहीतरी देणे लागतो, असा दृष्टीकोन समितीने दिला.(Pune News) इथे मिळालेल्या मूल्यांचा आज आपण जिथे काम करतो, तिथे लाभ होतो. खेड्या-पाड्यात अजूनही अनेक गरजू विद्यार्थी आहेत. त्यांना शोधून आधार देण्याचे काम करावे लागेल. समितीतून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी या कामात सक्रीय सहभाग घेऊन समितीचे हे काम पुढे न्यायला हवे.”

अमोल शहाणे म्हणाले, “समितीने कामाची प्रेरणा आणि आत्मविश्वास दिला. विविध भागांतून आलेल्या विद्यार्थ्यांमुळे संस्कृतीतील विविधता अनुभवली. नेतृत्व, शिस्त, संघर्ष, चिकाटी आणि स्वावलंबी वृत्ती जोपासायला समितीने शिकवले. सामाजिक बांधिलकीचे संस्कार देत आशावादी बनवले.”

प्रतापराव पवार म्हणाले, “समितीच्या कार्यात माजी विद्यार्थ्यांचा वाढणारा सहभाग आनंददायी आहे. गरजू मुलांची संख्या मोठी असल्याने समिती वसतीगृहाचा विस्तार करत आहे. या कामात माजी विद्यार्थ्यांचे योगदान महत्वाचे आहे.”

तुकाराम गायकवाड यांनी समितीच्या भावी योजना आणि आव्हाने विशद केली. नवीन वसतिगृहाच्या उभारणी विषयी माहिती दिली. राजू इंगळे यांनी मंडळाच्या उपक्रमाची माहिती दिली. आजी व माजी विद्यार्थ्यांच्या हितासाठी मंडळ पुढील काळात काम करणार असल्याचे नमूद केले.(Pune News) सुनील चोरे यांनी सूत्रसंचालन, स्वागत-प्रास्ताविक केले. संतोष घारे यांनी आर्थिक अहवालाचे वाचन केले. निसार चौगुले यांनी समन्वयन केले. मनीषा गोसावी यांनी आभार मानले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.