Talegaon Dabhade : मानवी जगण्याला समृद्ध करण्याची ताकद विज्ञानात – प्राचार्य डॉ. संभाजी मलघे.

एमपीसी न्यूज – मानवी जीवन अधिक सुकर व समृद्ध बनवायचे असेल तर विज्ञान व प्रगत तंत्रज्ञान यांचा नाविन्यपूर्ण वापर करावा लागेल. (Talegaon Dabhade) त्यातून मानवाचे कल्याण होणार आहे. विज्ञानामध्ये नवनवीन संशोधन करून माणसाच्या जगण्याला समृद्ध करण्याची ताकद असल्याचे मत इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी मांडले.

इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालय वरिष्ठ,कनिष्ठ विज्ञान विभागाच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे,इंद्रायणी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय आरोटे,उपप्राचार्य अशोक जाधव, विज्ञान विभाग प्रमुख प्रा.रोहित नागलगाव, प्रा. उत्तम खाडप आदी उपस्थित होते.

याप्रसंगी पुढे बोलताना प्राचार्य डॉ. मलघे यांनी कवितेच्या माध्यमातून विज्ञान आणि मानवी आयुष्य यांच्यातील संबंधांवर मार्गदर्शन केले. भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते भारतीय शास्त्रज्ञ भारतरत्न चंद्रशेखर वेंकट रामन यांचाआदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी विज्ञानामध्ये प्रगती करावी. (Talegaon Dabhade) तसेच जगदीशचंद्र बोस,सतीश धवन, डॉ.होमी भाभा, विक्रम साराभाई, भारतरत्न डॉ.अब्दुल कलाम, डॉ.रघुनाथ माशेलकर,डॉ.वसंत गोवारीकर,डॉ.जयंत नारळीकर,डॉ. अनिल काकोडकर,डॉ.विजय भटकर अशा अनेक शास्त्रज्ञांची परंपरा आहे. विद्यार्थ्यांनी या परंपरेचा अभ्यास करून विज्ञान समाजासाठी वापरले पाहिजे असे त्यांनी याप्रसंगी सांगितले.

Pune News : आठवणींना उजाळा अन यशाचं कौतुक

विज्ञान विभागाच्या माध्यमातून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे यांच्या हस्ते झाले.(Talegaon Dabhade) विद्यार्थ्यांनी काढलेल्या रांगोळी स्पर्धा, पोस्टर तसेच आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष निमित्ताने भरड धान्यापासून बनविण्यात आलेले विविध पदार्थ्यांच्या स्पर्धेचे आयोजन करून अनोख्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला.संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.स्पर्धेतील विजेत्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. यावेळी विज्ञानाचे महत्त्व डॉ. संजयआरोटे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संध्या केदारी यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार वैशाली गाडे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.