Pimpri News : पी. डी. पाटील नव्या भारताचे भवितव्य ओळखणारे शिक्षणतज्ज्ञ – माशेलकर

एमपीसी न्यूज –  डॉ. माशेलकर भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सध्या सुरू आहे. आणखी 25 वर्षांनी स्वातंत्र्याला शंभर वर्षे पूर्ण होतील. (Pimpri News) आगामी काळात एज्युकेशन आणि फ्यूचर (E=F) अर्थात शिक्षण आणि भवितव्य हेच नव्या भारताचे समीकरण माझ्या दृष्टीने महत्वाचे आहे. ड़ॉ. पी. डी. पाटील यांच्यासारख्या व्यक्तीने ते ओळखले आहे त्याच विचारांतून त्यांनी आपल्या शिक्षणसंस्थांची उभारणी केली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले.

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपति डॉ. पी. डी. पाटील यांच्या 70 व्या वाढदिवानिमित्त आयोजित गौरव समारंभात डॉ. माशेलकर बोलत होते. यावेळी पिंपरी येथे डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाच्या सभागृहात ड़ॉ. पी. डी. पाटील यांचा गौरव समारंभ झाला.

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील, ज्येष्ठ विचारवंत व महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, नागपूरचे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. वेदप्रकाश मिश्रा, अमेरिकेतील ज्येष्ठ वैद्यकीय शास्त्रज्ञ डॉ. मकरंद जावडेकर, डॉ. डी. वाय, पाटील विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील, कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे विश्वस्त डॉ. यशराज पाटील, कोल्हापूर येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपति डॉ. संजय पाटील, पुढारी समूहाचे संचालक डॉ. योगेश जाधव तसेच पी. डी. पाटील यांचे कुटुंबीय व्यासपीठावर उपस्थित होते.

डॉ. पी.डी. पाटील यांचे असंख्य चाहते, स्नेही आणि मित्रमंडळींनी या समारंभाला उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या. डी. वाय. पाटील विद्यापीठातील तसेच संलग्न संस्थांमधील (Pimpri News) प्राचार्य तसेच विभागप्रमुखांच्या वतीने डॉ. पी. डी. पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

Talegaon Dabhade : मानवी जगण्याला समृद्ध करण्याची ताकद विज्ञानात – प्राचार्य डॉ. संभाजी मलघे.

शिंदे म्हणाले, स्वातंत्र्यापूर्वीच्या भारतात लोकमान्य टिळक आणि आगरकर यांच्यात वैचारिक मतभेद होते. त्यात शिक्षण हा महत्वाचा मुद्दा होता. इतिहासातला शिक्षणाचा हा मुद्दा वर्तमानातही तितकाच महत्वाचा आहे. डॉ. पी. डी. पाटील यांच्यासारख्या शिक्षणसंस्थाचालकांनी अतिशय या क्षेत्राकडे लक्ष दिले.

पिंपरी-चिंचवड सारख्या उद्योग नगरीत अतिशय खडतर परिस्थितीत पी. डी. पाटील यांनी आपले सासरे डी. वाय. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू केले. (Pimpri News) प्रचंड मेहनत घेतली. उत्तम आणि दर्जेदार शिक्षण हे मूल्य त्यांनी आजवर सांभाळले. स्वातंत्र्योत्तर भारतात पी. डी. पाटील यांच्यासारख्या व्यक्तींचे नाव अतिशय महत्वाच्या स्थानी राहील. त्यांना समर्पणाने साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी भाग्यश्री पाटील यांचे ही योगदान तितकेच महत्वाचे आहे.

सत्काराला उत्तर देताना डॉ. पी. डी. पाटील भावूक झाले होते. ते म्हणाले, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात काम करण्याची संधी दिली त्यामुळेच मी इथवर वाटचाल करू शकलो. शिक्षणसंस्थांच्या इमारतींचे बांधकाम मी जातीने लक्ष घालून केले. संस्था म्हणजे चार भिंतींची इमारत नसते. तिथे सौदर्यदृष्टी आणि उपयोगिता याचा मिलाफ असावा लागतो. मी आत्मस्तुती करतो पण माझ्याकडे ती दृष्टी होती. म्हणून आम्ही इतक्या चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करू शकलो.

पुढच्या टप्प्यात आम्हाला 1996 मध्ये मेडिकल कॉलेजची परवानगी मिळाली. त्याची इमारत आठच महिन्यात उभारण्याचे आव्हान मी पेलले. (Pimpri News) त्यानंतरच्या काळात शिक्षणाचा दर्जा यावर जाणीवपूर्वक भर दिला. आज आमचे खासगी मेडिकल कॉलेजशी संलग्न रुग्णालय देशात पंधराव्या स्थानी, पश्चिम भारतात पाचव्या आणि पुण्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. डेंटल कॉलेज देशात दुसऱ्या क्रमांकाचे आहे. आमचे डॉ. डी. वाय पाटील हॉस्पीटल महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचे धर्मादाय रुग्णालय आहे.

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ युनिटेक आणि विद्यापीठ सोसायटीचे सचिव डॉ. सोमनाथ पाटील यांनी प्रास्ताविक केले. पी. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमच्या विद्यापीठाची आजवरची (Pimpri News) वाटचाल अत्यंत यशस्वी झाली आहे. आमच्या सगळ्यांची प्रेरक शक्ती म्हणून ते खंबीर असल्यानेच हे शक्य झाल्याचे ते म्हणाले. डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठ सोसायटीच्या विश्वस्त डॉ. स्मिता जाधव यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.