Pune News : प्रेयसीचा नग्न व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणीची मागणी

एमपीसी न्यूज : प्रेयसीचा अंघोळ करतानाचा नग्न अवस्थेतील व्हिडिओ तयार करून तो व्हायरल करण्याची धमकी देत तुझ्याकडे पैशाची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. (Pune News) पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधाकर सिंग उपेंद्रनाथ सिंग कुशवाह (उत्तरप्रदेश) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 29 वर्षीय तरुणीने या प्रकरणी तक्रार दिली आहे. 

Pune News : मेट्रोच्या कामकाजानिमित्त येरवडा भागातील वाहतूकीत बदल

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. दोघांमध्येही प्रेम संबंध होते. 2021 मध्ये आरोपीने फिर्यादीचे नग्न अवस्थेतील आंघोळ करतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. त्यानंतर तो व्हिडिओ फिर्यादीला पाठवून काम करत असलेल्या स्पा व्यवसायातून पैसे आणून दे अन्यथा व्हिडिओ शिवाजीच्या भावाला व इतर नातेवाईकांना पाठवण्याची धमकी दिली. (Pune News) इतकेच नाही तर फिर्यादीला मारहाण करून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. कोरेगाव पार्क पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.