Pune News : मेट्रोच्या कामकाजानिमित्त येरवडा भागातील वाहतूकीत बदल

एमपीसी न्यूज : मेट्रोच्या रिच तीन मार्गिकेच्या कामकाजानिमित्ताने येरवडा भागातील वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून (Pune News) सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी हे आदेश दिले आहेत.

Pune Crime : चोरट्यांनी फोडली पोलिसांचीच घरे; लाखोंचा ऐवज लंपास

वाहतूक शाखेकडून येरवड्यातील एन.एम. चव्हाण चौकाकडून अॅडलॅब चौकाकडील वाहतूक तसेच अॅडलॅब चौकाकडून एन. एम. चव्हाण रस्त्यावरील वाहतूक बंद केली आहे.(Pune News) वाहन चालकांनी बिशप स्कुलकडून एन.एम. चव्हाण चौकाकडे जाणारी वाहतूक गोल्फ अॅडलॅब चौकातुन उजवीकडे वळून कल्याणीनगरमधील लेन नंबर तीन येथून डावीकडे वळून एन. एम. चव्हाण चौकाकडे जायाचे आहे. तर, एबीसी चौकाकडून येणारी वाहतूक एन. एम. चौकाकडून डावीकडे वळून कल्याणीनगर लेन नंबर तीन येथून उजवीकडे वळून अॅडलॅब चौकाकडे जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.