Pune Crime : चोरट्यांनी फोडली पोलिसांचीच घरे; लाखोंचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज : पुण्यात घरफोड्यांचा धुमाकूळ सुरू असतानाच आता पुणे पोलिसांचे घरे देखील असुरक्षित असल्याचे वास्तव समोर आले असून, पोलीस वसाहतीत शिरून चोरट्यांनी दोन फ्लॅट फोडल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. (Pune Crime) या वसाहतीत वाहन चोरट्यांनी एक दुचाकी देखील चोरून नेली होती. त्यानंतर दहा दिवसांत बंद घरे देखील फोडल्याने शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. यासोबतच शहरात इतर भागातील पाच फ्लॅट देखील फोडण्यात आले आहेत.

याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार अल्लाउद्दीन मुसा सय्यद (वय 27) यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी रात्री ही घटना घडली असून, शनिवारी सायंकाळी पावणे सहा ते रविवारी सकाळी साडे आठ यावेळेत ही घटना घडली आहेत. दोन फ्लॅट फोडून चोरट्यांनी सव्वा लाखांचा ऐवज चोरून नेला आहे.

LPG Cylinder Price : महागाईचा भडका ! घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, व्यावसायिक सिलिंडरही महागलं!

मिळालेल्या माहितीनुसार, सय्यद हे पुणे पोलीस दलात पोलीस अंमलदार असून, ते क्यूआरटीत त्यांची नेमणूक आहे. दरम्यान ते विश्रांतवाडी पोलीस वसाहतीत राहण्यास आहेत. ते शनिवारी सायंकाळी घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. यादरम्यान अज्ञात चोरट्यांनी कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला.(Pune Crime) तसेच, त्यांच्या घरातून 33 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. तर, या वसाहतीतील पवन पवार यांचेही बंद घरफोडून चोरट्यांनी 93 हजारांचा ऐवज चोरून नेला. रविवारी सकाळी साडे आठच्या सुमारास हा प्रकार समोर आल्यानंतर चांगलीच खळबळ उडाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.