Alandi News : आळंदीमध्ये ओळख श्री ज्ञानेश्वरीची संस्कारक्षम उपक्रम शुभारंभ सोहळा संपन्न

एमपीसी न्यूज : आळंदी मधील श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था व श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने ओळख श्री ज्ञानेश्वरीची एक संस्कारक्षम उपक्रम(पर्व दुसरे) याचे इयत्ता 8 वी विद्यार्थ्यांकरीता प्रत्येक रविवारी सकाळी 9 ते 10:30 या वेळेत आयोजन केले आहे.

त्या सोहळ्याचा शुभारंभ श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत दि.1 डिसेंबर रोजी सकाळी 10 वा. करण्यात आला. यावेळी डॉ.सदानंद मोरे अध्यक्ष महाराष्ट्र साहित्य व संस्कृती मंडळ,संत तुकाराम महाराज वंशज,प्रमुख विश्वस्त संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान योगेश देसाई, ह. भ .प.नारायण महाराज जाधव, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था अध्यक्ष सुरेश वडगांवकर,सचिव अजित वडगांवकर यांनी या कार्यक्रमा दरम्यान मनोगतें व्यक्त करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

MSEB Pune : राजेंद्र पवार महावितरणच्या मुख्य अभियंतापदी पुण्यात रूजू

तसेच श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुध्दा या कार्यक्रमा विषयी माहिती देत आपली मनोगतें व्यक्त केली.या कार्यक्रमा वेळी श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती अध्यक्ष प्रकाश काळे, देवस्थान व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर,मोरे ताई,ह भ प सुभाष गेठे,उमेश बागडे भागवत महाराज साळुंखे, श्रीधर घुंडरे, व श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील सर्व शिक्षक कर्मचारी वर्ग,विद्यार्थी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.